‘गर्भवती महिलांसाठी रुग्णालय केव्हा बांधणार ?’, या महिला पत्रकाराच्या प्रश्नावर कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदाराचे संतापजनक उत्तर !

बेंगळुरू – कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील जोईदा तालुक्यात एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी एका महिला पत्रकाराने काँग्रेसचे आमदार आर्.व्ही. देशपांडे यांना ‘या भागात होणारे अपघात आणि विशेषतः गर्भवती महिलांची होणारी गैरसोय, यांमुळे या भागात रुग्णालयाची सुविधा कधी उपलब्ध होईल ?, असा प्रश्न विचारला. यावर आमदार देशपांडे हसले आणि डोळे मिचकावत म्हणाले, ‘‘काळजी करू नका, आम्ही तुमची प्रसूती दुसरीकडे कुठेतरी करून देऊ.’’ यावर महिला पत्रकारने ‘काय साहेब?’, असे म्हटले असता आमदाराने त्यांच्या उत्तराची पुनरावृत्ती करत ‘तुमच्या प्रसूतीची वेळ आली की, आम्ही ती पूर्ण करू’, असे संतापजनक उत्तर दिले.
🚨 Shocking!
Karnataka Congress MLA & ex-Minister RV Deshpande, when asked by a woman journalist about a hospital for pregnant women, arrogantly said: “We’ll get your delivery done elsewhere!”
If this is how he insults a journalist, how would he treat ordinary women? Such MLAs… pic.twitter.com/S59mFrhKB2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 3, 2025
उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना उपचारांसाठी उडुपी, मंगळुरू आणि इतर ठिकाणी जावे लागते. या समस्येवर बोट ठेवून महिला पत्रकाराने आमदारांना उपाययोजना विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. आमदार देशपांडे यांच्या विधानावर सामाजिक माध्यमांवर, तसेच राजकीय वर्तुळात जोरदार टीका होत आहे. लोकांनी त्यांचे विधान अत्यंत असंवेदनशील आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांनी ते महिलांचा अपमान आणि काँग्रेसच्या नीच मानसिकतेचे उदाहरण असल्याची टीका केली.
आमदार देशपांडे हे कर्नाटक सरकारमध्ये महसूल, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन मंत्रीपद भूषवले आहे. सध्या ते प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आहेत.
संपादकीय भूमिका
|
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’