
ठाणे, २ सप्टेंबर (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील उर्से हे गाव त्यांच्या ‘एक गाव एक गणपति’ या परंपरेसाठी ओळखले जाते. मागील ५३ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे. येथील मूर्ती शाडू मातीची आणि ठराविक उंचीची असते.
१. यंदाच्या गणेशोत्सवात गावातील तरुणांनी बाप्पासाठी विशेष सजावट केली आहे. या वेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पारंपरिक पूजेबरोबरच ही देशभक्तीप्रेरक संकल्पना गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावातील गणेशोत्सवातील पूजेचा मान प्रतिवर्षी चिठ्ठ्या टाकून निश्चित केला जातो.
२. उर्से गावाची लोकसंख्या अनुमाने २ सहस्र आहे. गणेशोत्सवाच्या काळात कामानिमित्त बाहेर असलेले गावकरीही गावात परततात. ‘धनंजय कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे गावातील वर्गणीवरच संपूर्ण उत्सवाचे आयोजन पार पडते.
३. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमही येथे राबवले जातात. गावातील स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, तसेच उत्तम कामगिरी बजावणारे विद्यार्थी आणि समाजकार्यात पुढाकार घेणार्या व्यक्ती यांचा प्रतिवर्षी सन्मान केला जातो.
४. मागील वर्षी उर्से गावाला जिल्हास्तरीय ‘गणराया पुरस्कार’ मिळाला होता.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण