
१. सौ. मंदा पारखी, वणी, यवतमाळ.
अ. ‘१०.७.२०२५ या दिवशी गुरुपूजन चालू झाल्यावर मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी माझ्या गुरुमाऊलीचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले.
आ. मी डोळे मिटल्यानंतर मला व्यासपिठावर पिवळा प्रकाश दिसला.
इ. आरती चालू झाल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. नंतर माझे शरीर आणि मन पुष्कळ हलके झाले. तेव्हा माझ्याकडून गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
ई. श्री. लोभेश्वर टोंगे (वय ७१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली; म्हणून पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७५ वर्षे) यांनी त्यांचा सत्कार केला. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’
२. सौ. विद्या राजू चंदे, वणी, यवतमाळ.
अ. ‘गुरुमाऊलींची आरती चालू झाल्यावर ‘प्रत्यक्ष गुरुमाऊली सुदर्शनचक्रावर बसून सर्व साधकांच्या सभोवताली फिरत आहेत’, असे मला जाणवले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.’
३. श्री. वामन मते (वय ७१ वर्षे), वणी, यवतमाळ.
अ. ‘९.७.२०२५ या दिवशी मला गुरुपौर्णिमेसाठी नियोजित असलेल्या कार्यालयात सजावट करण्याची सेवा होती. तेथे सर्व साधक संघटितभावाने सेवा करत होते. ते पाहून सेवा करतांना माझा भाव जागृत होत होता. सेवा पूर्ण होण्यासाठी रात्रीचे ११ वाजून गेले, तरी ‘विलंब झाला आहे’, असे मला जाणवले नाही.
आ. सौ. अस्वलेकाकू यांनी मला ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पू. अशोक पात्रीकरकाका यांचा सत्कार करायचा आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘मी पू. पात्रीकरकाका यांचा सत्कार करणार, म्हणजे मला त्यांच्या रूपात साक्षात् प.पू. गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन माझा भाव जागृत झाला.’
४. सौ. कीर्ती जाजडा, दिग्रस, यवतमाळ.
अ. ‘गुरुपूजनाला आरंभ झाल्यावर ‘फेटा आणि पिवळ्या रंगाचा सदरा घातलेली गुरुमाऊली आसंदीत विराजमान आहे, तसेच गुरुमाऊलीच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण विराट रूपात उभा आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. हे दृश्य पाहिल्यावर माझी भावजागृती झाली.’
५. सौ. कल्पना राऊत, यवतमाळ
अ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर मला सूक्ष्मातून गुरुचरण दिसले.
आ. मी नामजप करत असतांना माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न होत होते.
इ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू झाल्यावर माझे मन निर्विचार झाले.
ई. मला दैवी कण दिसले. मला सूक्ष्मातून गुरुमाऊलीचे दर्शन झाले.
उ. ‘देवाने मला दिवसभर भावावस्थेत ठेवले’, याबद्दल माझ्याकडून पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त होत होती.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.७.२०२५)
|
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !