कॅनरा बँक अपहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने अमित अशोक थेपाडे यांना अटक केली आहे. ही कारवाई ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत चालू असलेल्या अन्वेषणाचा भाग आहे. कॅनरा बँकेशी संबंधित ११७.०६ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. थेपाडे बराच काळ अधिकार्यांना चकवा देत होते. दक्षिण मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये ते गेल्या दोन महिन्यांपासून वास्तव्यास होते. त्या वेळी ही कारवाई करण्यात आली.
या वेळी धाडीत ५० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली. तसेच ९.५ लाख रुपयांची रक्कम, तसेच सोने आणि हिरेजडित दागिने, दोन वाहने आणि वित्तीय व्यवहारांशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे असू शकणारी डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. माननीय विशेष न्यायालयाने त्यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’