कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे संतापजनक वक्तव्य

बेंगळुरू (कर्नाटक) – चामुंडेश्वरी ही केवळ हिंदूंचीच संपत्ती नाही. दसरा हा धार्मिक उत्सव नाही. तो सांस्कृतिक उत्सव आहे. (दसरा हा धर्माच्या, म्हणजेच सनातन धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेला उत्सव आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) बानू मुश्ताक यांनी दसर्याचे उद्घाटन केले, तर त्यात काय चूक आहे ?, असा संतापजनक प्रश्न उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला. मैसुरू दसरा उद्घाटनासाठी हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्या निवडीला भाजपने केलेल्या विरोधावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
“Goddess Chamundeshwari is not the property of Hindus alone!” – Karnataka Deputy Chief Minister D.K. Shivakumar’s Infuriating Statement
👉 Under the guise of “Sarva-dharma-samabhava", #Congress is now attempting to make even Hindu deities ‘secular’! Hindus must resist this… pic.twitter.com/za6mjsTCB1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 27, 2025
शिवकुमार पुढे म्हणाले की,
१. चामुंडी टेकडी, चामुंडीदेवी ही सर्व धर्मियांची आहे. सर्व समाजातील लोक चामुंडेश्वरी मंदिरात जातात. ती त्यांची श्रद्धा आहे. आपण मशीद, चर्च, जैन मंदिर, गुरुद्वारा येथे जातो. गुरुद्वाराला जाणे चुकीचे आहे का ? मग हिंदु मंदिरात इतर धर्मीय गेले, तर त्याला विरोध का ?
२. अनेक हिंदूंनी इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही का ? (हिंदूंचे तलवारीच्या टोकावर बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले, हा इतिहास आहे. अत्याचारी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंचे धर्मांतर केले. त्यामुळे अर्धसत्य बोलून समाजाचा बुद्धीभेद करण्याचा कुटील प्रयत्न करणारे डी.के. शिवकुमार यांचा निषेध ! – संपादक) काही हिंदु परंपरा मुसलमान पाळत नाहीत का ? (यावरून हिंदूंनी मुसलमानांच्या परंपरा पाळायला हव्यात, असे कुठे आहे ? – संपादक) हे सगळे राजकारण आहे. मग टेकडी चढायला काय हरकत ? उद्घाटन करायला काय हरकत ? असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केला. (हिंदूंची हरकत आहे ! – संपादक) अयोध्येत केवळ हिंदूंनीच यावे, असा फलक कुठे आहे ? (गोमांस भक्षण करणारे आणि मूर्तीपूजा न मानणार्यांचे हिंदूंच्या मंदिरात काय काम ? – संपादक)
तुम्ही (काँग्रेसी) एका कुटुंबालाच तुमचा देव मानले आहे ! – खासदार यदुवीर वडेयार

चामुंडी टेकडी सर्व धर्म आणि समुदाय यांसाठी उघडी आहे. देवीची पूजा करणारे, तिच्यावर विश्वास ठेवणारे आणि तिचा आदर करणारे लोक सर्व जात अन् धर्म यांमध्ये आहेत; परंतु चामुंडी टेकडी एक शक्तिपीठ आहे. देवी चामुंडेश्वरी ही हिंदूंची देवी आहे आणि तिचा उल्लेख हिंदु धर्मग्रंथ मार्कंडेय पुराणातील ‘देवी महात्म्य’मध्ये आहे; इतर कोणत्याही धर्माच्या ग्रंथांमध्ये नाही. येथे प्रतिदिन हिंदु धर्मशास्त्रानुसार पूजा आणि परंपरा चालतात. येथे येणारे सर्व जण तिची हिंदु देवी म्हणूनच पूजा करतात. दसरा आपल्या देशातील सर्वांत मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. सर्व धर्माचे लोक त्यात सहभागी होऊ शकतात; पण मुळात तो एक हिंदु सण आहे. त्याचा दिनांक हिंदु पंचांगानुसार निश्चित केला जातो. हा असा सण नाही, जो कुणाच्या तरी इच्छेनुसार किंवा भावनांनुसार पालटला जाऊ शकतो. तुम्ही एका कुटुंबालाच तुमचा देव मानले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही देवीच्या हिंदु स्वरूपाला आणि दसर्याच्या धार्मिक परंपरेला नाकारण्याचे धाडस करू नका. आम्ही राजकारण करत नाही. तुम्ही लांगूलचालन करण्याच्या राजकारणासाठी आमच्या धर्मावर आक्रमण करता, तेव्हा आम्ही त्याचे रक्षण करण्यासाठी उभे राहिलो आहोत, असे प्रत्युत्तर मैसुरूचे भाजपचे खासदार श्री. यदुवीर वडेयार यांनी ‘एक्स्’वर पोस्ट करून दिले आहे.
On the sacred day of Gowri Habba, DCM D.K. Shivakumar claimed that “Chamundi Betta and Chamundi Devaru are not Hindu property.” This remark is utterly condemnable.
Chamundi Betta is a Shakti Peetha – sanctified by the Shastras and revered by crores of Hindus. The temple was, is,… pic.twitter.com/08n2LHIWvL
— Yaduveer Wadiyar (@yaduveerwadiyar) August 26, 2025

संपादकीय भूमिका
|
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण