सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग – जगद्गुरु संत नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आध्यात्मिक, तसेच सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजजागृतीचे कार्य अविरतपणे चालू आहे. याचा महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्रालाही अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून जगद्गुरु संत नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आणि समर्पित प्रयत्नांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांनी २ पिढ्यांना धार्मिक प्रेरणा देऊन समाजात नैतिक मूल्यांची जपणूक केली आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी, तसेच लोककल्याणासाठी त्यांनी केलेली कार्ये अनन्यसाधारण आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या आध्यात्मिक साधनेसाठी आणि समाजसेवेसाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करणे हे निश्चितच गौरवाचे ठरेल.
म्हणूनच आपण आपल्या राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला हा पुरस्कार जगद्गुरु संत श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांना प्रदान करून त्यांना गौरवण्यात यावे, असे मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !