डॉ. दाभोलकरांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभ !

पुणे – मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ मधील साखळी बाँबस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने मृत्यूमूखी पडलेल्या निरपराध लोकांना न्याय देऊ शकलो नाही, असा दावा माजी भारतीय पोलीस अधिकारी मीरा चड्डा-बोरवणकर यांनी केला. ‘पोलीसदलासह सर्व सरकारी विभागांची निष्ठा ही राज्यघटनेवरच असली पाहिजे, खाकीने भगवे, हिरवे, पांढरे होणे हे घातक आहे, असा उल्लेख त्यांनी केला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यात कशा प्रकारे हिंसाचार घडला, याचे पुरावे असून गुन्हा नोंद केला, तर तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त करणार नाही, असा राजकीय दबाव आणण्यात आला, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने पुण्यातील ‘साने गुरुजी स्मारक’ येथे डॉ. दाभोलकर ग्रंथमालेतील ५ पुस्तकांचे प्रकाशन २० ऑगस्टला बोरवणकर, ‘भूरा’कार शरद बाविस्कर आणि शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी ‘आंतरजातीय वधू-वर सूचक केंद्रा’च्या ‘विवेकी विवाह’ या ऑनलाईन संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले.
संपादकीय भूमिका :पोलीस अधिकारी खात्यात कार्यरत असतांना राजकीय हस्तक्षेप एखाद्या प्रकरणात होत असेल, तर आवाज का उठवत नाहीत ? निवृत्त झाल्यावरच दावे का केले जातात ? असे केल्याने ना अपराधींना शिक्षा होते, ना संबंधित पोलिसांना न्याय मिळतो ! |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !