
नवी देहली – आम्ही ‘ॲक्सियम मोहिमे’अंतर्गत २ आठवडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहिलो. मी या मोहिमेचे नेतृत्व करत होतो. ही मोहीम संपूर्णपणे भारताचीच मोहीम होती, असे वक्तव्य अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी केले. गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या ४ वैमानिकांची निवड करण्यात आली असून त्यांपैकी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एक आहेत. त्यामुळेच ते अमेरिकेच्या ‘ॲक्सिअम मोहिमे’त सहभागी झाले होते. या मोहिमेच्या अंतर्गत गोळा केलेल्या माहितीचा उपयोग भविष्यात गगनयान आणि भारताच्या अन्य अंतराळ मोहिमेसाठी होईल, असेही ते म्हणाले.
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी ‘गगनयान’ मोहिमेविषयी म्हटले की, ही इस्रोची मानवी अंतराळ मोहीम आहे. यांतर्गत वर्ष २०२७ मध्ये हवाईदलाचे ३ वैमानिक अंतराळयानात पाठवले जातील. हे वैमानिक पृथ्वीपासून ४०० किमी कक्षेत ३ दिवस रहातील. त्यानंतर हे अंतराळयान हिंद महासागरात उतरवले जाईल. याला अनुमाने २० सहस्र १९३ कोटी रुपये खर्च येणार आहे.
‘इस्रो’च्या ‘गगनयान मोहिमे’चे असे असतील ३ टप्पे !
१. २ रिकामी चाचणी उड्डाणे केली जातील. वर्ष २०२५ च्या शेवटी पहिले उड्डाण होऊ शकते.
२. तिसर्या उड्डाणात एक रोबोट पाठवला जाईल.
३. त्यास यश आल्यानंतर चौथ्या उड्डाणात मानव अंतराळात जाऊ शकतील. वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत हे करण्याचे ध्येय आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण