बांगलादेशी पत्रकार सल्लाउद्दीन शोएब चौधरी यांचा दावा

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सैन्यातील बडतर्फ मेजर असणारा, तसेच ‘अन्सार अल इस्लाम’ या जिहादी संघटेचा प्रमुख आणि अल्-कायदाचा स्थानिक गटप्रमुख सैयद जियाउल हक झिया याच्यावर ठेवलेले ५० लाख डॉलर्सचे (४१ कोटी ५० रुपयांचे) बक्षीस अमेरिकेने रहित केल्याचा दावा बांगलादेशी पत्रकार सल्लाउद्दीन शोएब चौधरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत केला आहे. झिया याच्यावर अमेरिकी नागरिक अभिजित रॉय यांच्या हत्येचा आणि त्यांची पत्नी रफिदा बोन्या यांना गंभीररित्या घायळ केल्याचा आरोप आहे.
🚨 Trump Administration backs Al Qaeda!
In a shocking move, the @StateDept under President Trump has silently deleted it's US$5 million bounty announcement on Major (sacked) Syed Ziaul Huq Zia, kingpin of Ansar Al Islam, a local franchise of Al Qaeda from the website. Zia is… pic.twitter.com/5D8uV8Pzma
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) August 14, 2025
चौधरी यांनी म्हटले की, अलीकडच्या काही महिन्यांत अल-कायदाचे आतंकवादी आणि इतर इस्लामी कट्टरतावादी यांनी बांगलादेशात त्यांच्या कारवाया वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात जियाउल हक झिया या कुप्रसिद्ध आतंकवाद्याने, जो अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या पसार असलेल्या लोकांच्या सूचीत आहेत, त्याने उघडपणे मणीपूर, खलिस्तान आणि काश्मीर येथील बंडखोर चळवळींची कार्यालये बांगलादेशात चालू करण्याचे आवाहन केले. मागील वर्षी झालेल्या जिहादी समर्थित सैनिकी बंडानंतर झिया गुप्तपणे पुन्हा बांगलादेशात परतला असल्याचे मानले जाते.
🚨 Claim by Bangladeshi journalist Salah Uddin Shoaib Choudhury @salah_shoaib:
🇺🇸 U.S. has withdrawn $5M reward on Al-Qaeda chief Syed Ziaul Haq Zia – accused in Avijit Roy’s murder & leading Ansar al-Islam.
He alleges this proves U.S. is backing extremists in Bangladesh, after… pic.twitter.com/yEqdK6lqlP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 19, 2025
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील गेल्या वर्षभरातील घटनाक्रम पहाता यामागे अमेरिका आहे, हे समोर येत होतेच. आता तेथील आतंकवाद्याला पाठीशी घालण्याच्या या प्रयत्नातून अमेरिकाच यामागे आहे, हे उघड होते ! |
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक