हिंदु जनजागृती समितीचा लोकप्रतिनिधी, प्रशासन, हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्याचा उपक्रम

भाजपचे नगरसेवक श्री. विशाल धनवडे यांना राखी बांधतांना कु. प्राची शिंत्रे

पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे लोकप्रतिनिधी, प्रशासन, हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्याचा विशेष उपक्रम घेण्यात आला. यात भाजपचे नगरसेवक श्री. विशाल धनवडे, भाजपचे सरचिटणीस श्री. गिरीश खत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाप्रमुख श्री. प्रकाश गोरे, भुकूम येथील रामेश्वर देवस्थानचे विश्वस्थ श्री. विजय माझीरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. दिनेश माझिरे, स्वामीनारायण मंदिराचे सनदी लेखापाल श्री. राधेशाम आगरवाल, सी.एस्.आर्. सल्लागार श्री. विजय वरूडकर, पुणे येथील ‘श्री स्वामी समर्थ मठा’चे विश्वस्त श्री. नरसिंह लगड, ‘शिववंदना परिवारा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्राज भिलारे, ‘परशुराम सेवा संघा’चे श्री. विश्वजित देशपांडे, मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नीलेशशेठ बोराटे यांनाही राखी बांधण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने रक्षाबंधन !

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती महापालिकेचे सभापती श्री. विलास मडिगेरी यांना सनातन संस्थेच्या वतीने राखी बांधण्यात आली. या वेळी सनातनच्या पू. (साै.) संगीता पाटील उपस्थित होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांना राखी बांधताना सौ. आरती
दैनिक भास्कर, पुणेचे संपादक श्री. मुनिष शर्मा यांना राखी बांधताना सौ. वृंदा सटाणेकर ‘लोकमत’ वृत्तपत्राचे समूह संपादक श्री. विजय बाविस्कर यांना राखी बांधताना कु. क्रांती पेटकर
श्री. विलास मडिगेरी,  सभापती स्थायी समिती पिं.चि. महापालिका, त्यांच्या डावीकडे संत पू. (सौ.) संगीता पाटील ‘पुणे प्रहार न्यूज पोर्टल’चे संपादक श्री. प्रतीक गंगणे यांना राखी बांधतांना डॉ. ज्योती काळे

विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, संपादक यांनाही राखी बांधण्यात आली. यामध्ये ‘पुणे प्रहार न्यूज नेटवर्क’चे संपादक श्री. प्रतीक गंगणे, ‘प्रभात पिंपरी’चे पत्रकार श्री. प्रकाश गायकर, ‘सामना’चे श्री. मंगेश हाडके, ‘केसरी’चे श्री. भीमराव पवार, ‘दैनिक सकाळ, पिंपरी’चे वरिष्ठ बातमीदार श्री. पितांबर लोहार, ‘दैनिक पुढारी, पिंपरी’चे श्री. प्रदीप पाटील, ‘दैनिक केसरी, पुणे’ येथील वरिष्ठ वार्ताहर श्री. स्वप्नील पोरे, ‘दैनिक लोकमत, पिंपरी’चे उपसंपादक श्री. प्रशांत होनमाणे, मंचर येथील पत्रकार श्री. संतोष वळसे, ‘पेण टाइम्स न्यूज पोर्टल’चे संपादक श्री. अजय सोनवणे, ‘लोकमत वृत्तपत्रा’चे श्री. पुष्कर कुलकर्णी, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे श्री. अभिजीत थिटे, ‘लोकमान्य सांजवार्ता’चे कार्यकारी संपादक श्री. गौरव कुलकर्णी, ‘पुण्यनगरी वृत्तपत्रा’चे संपादक श्री. साबळे, ‘पाक्षिक नवा सिंहगड परिसरा’चे संपादक श्री. जितेंद्र रानडे, ‘लोकमत’चे समूह संपादक श्री. विजय बाविस्कर, ‘दैनिक भास्कर, पुणे’चे संपादक श्री. मुनिष शर्मा,  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राखी बांधण्यात आली.