
पू. अनंत आठवले : व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले आहे. ब्रह्मसूत्र वाचले, तर काही कळणार नाही. त्यांनी फक्त सूत्रात सांगितले. त्यामुळे सगळ्यांना ते कळले नसेल. शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य करून ठेवले आहे; म्हणून ते आपल्याला कळते, नाहीतर ब्रह्मसूत्र आपल्याला कळलेच नसते. शंकराचार्यांचे ज्ञान किती असेल ! केवळ ३२ व्या वर्षांपर्यंत त्यांनी किती लिहून ठेवले आहे ! हे सगळे त्यांचे पूर्वजन्मीचेच ज्ञान असेल. आपण म्हणतो, ते आधीच्या जन्मांच्या संस्कारामुळे होते, फक्त काही कारणामुळे ब्रह्मात विलीन झाले नव्हते. ते या जन्मात आल्याबरोबर कशाने तरी ते जागृत झाले. भगवान् श्रीकृष्ण सांदीपनींच्या आश्रमात गेले. तेथे फक्त ८ दिवस राहिले होते. त्यांनी १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात् केल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. ८ दिवसांत कृष्णाचे सगळे शिक्षण पूर्ण झाले; कारण त्याला आधीच सगळे येत होते.
पू. अनंत आठवले : श्रीकृष्ण फक्त ८ दिवस सांदीपनींच्या आश्रमात होते. ८ दिवसांत एवढ्या विद्या आणि एवढे ज्ञान. मी नॉन स्टॉप (न थांबता) बोलत राहिलो, तरी माझे सांगूनही होणार नाही. योगवासिष्ठ ग्रंथात वसिष्ठांनी उल्लेख केला आहे. रामाने वसिष्ठांना काही प्रश्न विचारले. वसिष्ठांनी सांगितले, ‘‘तुम्ही स्वतः विष्णूचे अवतार आहात. तुम्हाला सगळे माहितीच आहे; पण तुम्ही म्हणत आहात, प्रश्न विचारत आहात, मग मी तुम्हाला सांगतो.’’ त्यानंतर वसिष्ठांनी रामाला ज्ञान दिले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी इकडे येतो, ते बरे आहे ना ! मला खूप शिकायला मिळते.
(५.१०.२०२४ या दिवशी पू. अनंत आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात झालेल्या संभाषणाचा निवडक भाग)
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
अध्यात्माचे अनंतत्त्व !