
कुडाळ – ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) उपक्रमांतर्गत तालुक्यातील पावशी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याने सरपंच सौ. वैशाली सदानंद पावसकर यांच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत १३ ऑगस्ट २०२५ या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय पावशी येथे सरपंच सौ. वैशाली पावसकर यांनी राष्ट्रध्वज फडकावतांना योग्य ती सावधानता बाळगली नाही. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा हिरवा रंग वरती ठेवून ध्वज फडकावला. त्या वेळी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली आणि पोलीस पाटील बिले यांनी या घटनेला आक्षेप घेतला अन् तेली यांनी स्वत:च्या भ्रमणभाषद्वारे त्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर ‘राष्ट्रध्वज उलटा फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला’, अशी तक्रार उपसरपंच तेली यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. यानुसार पोलिसांनी सौ. वैशाली पारकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati