मुंबईतील ५ जणांना अटक !

इतगपुरी (जिल्हा नाशिक) – देहली आणि मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये चालणार्या अवैध ‘कॉल सेंटर’वर धाड घालून सव्वा कोटी रुपयांची रोकड, अर्धा तोळा सोने आणि १ कोटी रुपयांच्या ७ आरामदायी (लक्झरी) चारचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मुंबई येथील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी ‘ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिस’चे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडासह ५ देशांतील नागरिकांची फसवणूक करत होते. या कारवाईत ६२ ‘ऑपरेटर’ कार्यरत असून ४४ भ्रमणसंगणक, ७१ भ्रमणभाषसंच, २ सहस्र कॅनेडियन डॉलर, १ लाख २६ सहस्र गिफ्ट व्हॉउचर, ७ आरामदायी चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
विशाल यादव, शाहबाज, दुर्गेश, अभय राज उपाख्य राजा, समीर उपाख्य कालिया उपाख्य सोहिल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भाडेतत्त्वावर रिसॉर्टमध्ये घेतलेल्या खोल्यांत बहुधा रात्रीचेच काम चालू असायचे. इगतपुरीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना या कारवाईचा मागमूसही नव्हता. (असे पोलीस काय कामाचे ? केंद्रीय स्तरावरील यंत्रणेला जे समजते, ते राज्यातील पोलिसांना का समजत नाही ? – संपादक)
| राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणारी अवैध ‘कॉल सेंटर’ चालू असणे पोलिसांना लज्जास्पद ! |
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा