
सोलापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर आणि बीड येथे लोकप्रतिनिधी, प्रशासन, हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्याचा विशेष उपक्रम घेण्यात आला.
यात सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख आणि किरण देशमुख, दाते पंचांगकर्ते श्री. मोहन दाते, पद्मावती कन्वेक्शन हॉलचे श्री. विवेक दिवसानी, दुस्सा इव्हेंट्सचे श्री. कृष्णहरि दुस्सा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु बहुभाषिक पुरोहित संघमचे पंडित वेणुगोपाल जिल्ला, प्रतिष्ठित उद्योजक व्यापारी श्री. सोमनाथ रकब्बले, बीड येथील उद्योजक राजकुमार बंब, अधिवक्ता महेश धांडे, माजी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यांना राखी बांधण्यात आली.
विविध वृत्तपत्रे आणि स्थानिक वृत्तवाहिन्या यांचे संपादक, निवासी संपादक, पत्रकार, तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनाही राखी बांधण्यात आली. सर्वांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !