
तेहरान (इराण) – इराणने अफगाण निर्वासितांवर कठोर कारवाई चालू केली आहे. इराणने गेल्या १०० दिवसांत अनुमाने १० लाख अफगाण नागरिकांना परत पाठवले असून त्यांपैकी ४ लाख जण एकट्या तेहरान प्रांतातील आहेत, अशी माहिती तेहरानचे राज्यपाल महंमद सादिक मोतामेदियन यांनी दिली. गेल्या महिन्यात इस्रायलशी झालेल्या युद्धानंतर इराणने देशातील अवैध अफगाण शरणार्थींवर कारवाई चालू केली आहे.
🚨 100 Days, 10 Lakh Expelled!
In just 100 days, Iran has driven out 1 million Afghan refugees – despite sharing religion.
If Iran can act to protect its borders,
🇮🇳 When will India take a firm stand against Bangladeshi & Rohingya intruders?#BorderSecurity
PC: @KabulNow https://t.co/qvlcozyVwi pic.twitter.com/OR3ZKS0v5m— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 10, 2025
१. इराणच्या सामाजिक कामगार संघटनेचे प्रमुख हसन मौसावी चेलिक म्हणाले की, अलीकडच्या काळात अफगाण निर्वासितांना बाहेर काढतांना अधिकार्यांनी तेे कायदेशीररित्या रहात आहे कि अवैधरित्या, हे न पहाता सरसकट कारवाई केली आहे.
२. इराणी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार काही अफगाण गटांवर हेरगिरी, आतंकवाद आणि ड्रोन बनवण्यासारख्या गंभीर आरोपांची चौकशी चालू आहे. त्यामुळे देशात त्यांची उपस्थिती धोकादायक ठरू शकते.

मार्च २०२५ मध्ये दिली होती चेतावणी !
इराणने मार्च २०२५ मध्ये ‘बेकायदेशीर रहाणार्यांनी ६ जुलैपर्यंत देश सोडावा, अन्यथा कारवाई केली जाईल’, अशी स्पष्ट चेतावणी दिली होती. यानंतरही अनेक निर्वासितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना आता हाकलून लावण्यात येत आहे. इराणमध्ये ६० लाखांपर्यंत अफगाण नागरिक रहातात. त्यामुळे मूलभूत सोयीसुविधांवर ताण वाढत आहे.
संवेदनशीलता दाखवा ! – अफगाणिस्तान
अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारचा पंतप्रधान महंमद हसन अखुंद याने इराणला संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेच्या अफगाणिस्तानातील संचालक मिया पार्क यांनी सांगितले की, इराणने अफगाणांशी आदराने वागले पाहिजे.
संपादकीय भूमिकाइस्लामी देश इराण त्यांच्याच धर्मबांधवांना घुसखोर नाही, तर निर्वासित म्हणून आलेल्यांना देशातून हाकलून लावतो, तर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांच्या संदर्भात भारत अशी कठोर भूमिका कधी घेणार ? |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !