|

पुणे – येथील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मागासवर्गीय मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता; मात्र या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलीस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा कुठलाही सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात कोणताही विश्वासार्ह पुरावा समोर आलेला नसल्याने गुन्हा नोंद होऊ शकत नाही.
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी संबंधित मुली करत असल्या, तरी ती न्यायालयीन निकषांनुसार ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात तथ्य नसल्याचे पोलिसांनी पुन्हा अधोरेखित केले आहे. अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात आले, तिथेही त्यांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या अन्वेषणाच्या वेळी पोलीस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा काहीही संबंध नाही, त्या ना संबंधत पथकात होत्या ना ‘दामिनी मार्शल पथका’चा भाग होत्या, असे स्पष्ट करत पोलीस उपायुक्तांनी मुलींनी केलेल्या आरोपांमध्ये कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात काही प्रशासकीय त्रुटी असून त्याचे सध्या अन्वेषण चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !