देशाची फाळणी करणारे भगवा आतंकवादाविषयी बोलत आहेत ! – Swami Avimukteshwaranand Saraswati

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची काँग्रेसवर टीका

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

नवी देहली – ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांचे अनुयायी आतंकवादाविषयी बोलत आहेत. देशाचे दोन तुकडे ज्यांच्यामुळे झाले, ते आम्ही नाही. हिंदू कधीही फाळणीच्या गोष्टी करत नाही. ते एकोप्याने रहातात. आमच्यामुळे देशाचे तुकडे झालेले नाहीत, अशा शब्दांत ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भगवा आतंकवादावरून काँग्रेसवर टीका केली.

आतंकवादाला रंग आणि धर्म नसतो !

भगवा आतंकवादाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शंकराचार्य म्हणाले की, आतंकवादाला कुठलाही रंग किंवा धर्म नसतो. आतंकवादी हा आतंकवादी असतो. भगवा आतंकवादी असेल, तर काय पूजा करणार का त्याची ? रंगाचा आणि आतंकवादाचा काय संबंध आहे ? आतंकवादाविषयी दयामाया दाखवली जाऊ नये. मुंबईत स्फोट झाले, आतंकवादी सापडलेले नाहीत. मालेगावच्या स्फोटातले आरोपी सापडलेले नाहीत.