पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा २१ वा वर्धापनदिन समारंभ १ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार सोलापूर येथील नामांकित अभियांत्रिकी संस्था ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना प्रदान करण्यात आला. डॉ. विजय आठवले हे सनातनचे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांचे चिरंजीव आहेत, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पुतणे आहेत.

या वेळी सोलापूर विद्यापिठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार पंढरपूर येथील ‘पालवी संस्थे’च्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना प्रादन करण्यात आला. ‘वालचंद शिक्षण समुहा’चे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, वैभव गांधी, पराग शहा यांनी पुरस्कार प्राप्त करणार्या सर्वांचे अभिनंदन केले. ‘नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी देहली’चे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभास भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर, एच्.एस्.एन्.सी. (हैद्राबाद नॅशनल कॉलेजिएट बोर्ड) विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी