आक्रमणकर्त्या ५ अल्पवयीन मुलांपैकी ४ जणांना अटक

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथील ‘सेंट्रल स्क्वेअर शॉपिंग सेंटर’बाहेर ५ अल्पवयीन मुलांनी भारतीय वंशाचे सौरभ आनंद यांच्यावर आक्रमण करत त्यांचे मनगट कापले. एका मुलाने त्याला मुक्का मारला, तर दुसर्याने त्याच्या मानेवर चाकू धरला. जेव्हा सौरभ आनंद यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हात वर केला, तेव्हा या मुलाने त्याच चाकूने आनंद यांचे मनगट कापले. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींपैकी ४ जणांना अटक केली.
🚨 Brutal Attack on Indian-Origin Man in Melbourne!
🩸 Victim in critical condition after a life-threatening assault
👥 4 out of 5 juvenile attackers arrested
🇮🇳 GOI must investigate if these rising attacks on Indians abroad are part of a larger global conspiracy
🛑 Strong… pic.twitter.com/WejpCvmVPx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 27, 2025
१. सौरभ आनंद यांनी या घटनेविषयी सांगितले की, ते संध्याकाळी औषधाच्या दुकानातून औषध घेऊन परतत होते. या वेळी ते एका मित्राशी दूरभाषवर बोलत होते. तेव्हा ५ मुलांनी त्यांच्यावर मागून आक्रमण केले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झाला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांचा हात निखळला होता.
२. या वेळी सौरभ आनंद यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. येथे अनेक घंट्यांच्या शस्त्रकर्मानंतर त्यांचा हात पुन्हा जोडण्यात आला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रकृतीतील सुधारणेविषयी सध्या काहीही सांगता येत नाही.
संपादकीय भूमिकागेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांतही भारतियांवर वर्णद्वेषातून आक्रमण होण्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे का ?, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे आणि अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी