दिसे हिंदु राष्ट्र गोवर्धनगिरिधारीच्या कृपेने ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमाऊलीची करू आराधना ।
मांगल्याचे प्रतीक साक्षीला द्याना ।। १ ।।

करूनी प्रण हिंदु राष्ट्र स्थापनेचा ।
महामेरू उचलू निश्चयाचा ।। २ ।।

श्री. गोविंद लोलयेकर

नववर्ष मुहूर्ते करूनी प्रार्थना ।
गुरुमाऊलीची करू आराधना ।। ३ ।।

नववर्षदिनी ऋतुराज अवतरला ।
वसंत संगीत बहरे कोकिळेला ।। ४ ।।

निसर्ग संगीत स्फुरले वर्षाऋतूला ।
मयूर नृत्याने घातली साद तयाला ।। ५ ।।

क्रांतीगीत हे हिंदु एकतेचे ।
धर्मवीर संभाजीराजांनी दिलेल्या प्रेरणेचे ।। ६ ।।

करू अशक्य ते शक्य संघटन शक्तीने ।
दिसे हिंदु राष्ट्र गोवर्धनगिरिधारीच्या (टीप) कृपेने ।। ७ ।।

हीच खरी उपासना अन् प्रार्थना गुरुदेवांना (टीप) ।
नववर्षदिनी करू निश्चय, हिंदु राष्ट्र स्थापण्या ।। ८ ।।

गुरुचरणी प्रार्थना केल्यावर त्यांनीच माझ्याकडून वरील कविता लिहून घेतली. कृतज्ञता गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) !

टीप – गोवर्धनगिरीधारी म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच गुरुदेव, गुरुमाऊली हेसुद्धा त्यांनाच उद्देशून म्हटले आहे.

– श्री. गोविंद लोलयेकर (वय ७१ वर्षे), काणकोण, गोवा. (५.६.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक