मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथील बोरोनिया भागातील श्री स्वामीनारायण मंदिरावर अज्ञात व्यक्तींनी आक्षेपार्ह आणि वांशिक द्वेषयुक्त संदेश लिहून अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या भिंतींवर ‘गो होम ब्राऊन’ (अश्वेतांनो घरी जा) असे वर्णद्वेषी लिखाण करण्यात आले होते. तसेच शेजारील आशियातील लोकांच्या २ रेस्टॉरंट्सच्या भिंतींवरही अशाच प्रकारचे आक्षेपार्ह शब्द लिहिलेले आढळले. या घटनेनंतर हिंदु, तसेच बहुसांस्कृतिक संघटना यांनी एकत्र येत या द्वेषाविरोधात आवाज उठवला. स्थानिक समुदाय आणि ‘सिटी ऑफ ग्रेटर नॉक्स’च्या ‘मल्टीफेथ नेटवर्क’ने मंदिरास पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
‘हिंदु कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया’चा तीव्र निषेध
‘हिंदु कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया’चे (व्हिक्टोरिया शाखा) अध्यक्ष मकरंद भगवत यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, हे मंदिर शांतता, भक्ती आणि एकता यांचे प्रतीक आहे. अशा प्रकारची घटना आमचे धार्मिक स्वातंत्र्य आणि ओळख यांवर आक्रमण आहे.
मुख्यमंत्री जैसिंटा एलन यांचा खासगी संदेश
व्हिक्टोरिया राज्याच्या मुख्यमंत्री जैसिंटा एलन यांनी जरी सार्वजनिकरित्या या घटनेचा निषेध केलेला नाही, तरी त्यांच्या कार्यालयाकडून मंदिर व्यवस्थापनाला खासगी संदेश पाठवण्यात आला आहे. त्या संदेशात ही घटना घृणास्पद, वंशद्वेषपूर्ण आणि भीती पसरवणारी असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एलन यांनी सांगितले की, व्हिक्टोरिया पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत.
चार घटनांची चौकशी चालू !
पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बोरोनिया आणि बेयसवॉटर या भागांत घडलेल्या ४ घटना परस्परांशी संबंधित असू शकतात. या सर्व ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या. यात स्वामीनारायण मंदिर, २ आशियाई रेस्टॉरंट्स आणि एक हीलिंग सेंटर यांचा समावेश आहे. समाजात अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण वर्तनाला कोणतेही स्थान नाही.
संपादकीय भूमिका२ दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे भारतीय वंशाच्या व्यक्तीला वर्णद्वेषावरून मारहाण करण्यात आली आणि आता मंदिरावर वर्णद्वेषी लिखाण करण्यात आले. भारत सरकारने याची नोंद घेऊन ऑस्ट्रेलियातील सरकारवर दोषींवर कारवाई करण्याचा आणि असे प्रकार पुन्हा होऊ न देण्यासाठी दबाव आणणे आवश्यक आहे ! |

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण