
अंबरनाथ – आनंदनगर एम्.आय.डी.सी. सायंकाळी कामावरून परतत असतांना वैशाली सुनील धोत्रे (वय ४५ वर्षे) या कानात ‘हेडफोन’ लावून रेल्वे रूळ ओलांडत होत्या. समोरून लोकल येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही, तसेच लोकलच्या हॉर्नचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. तेथून जाणारे दादू आंबेरकर (वय ३० वर्षे) यांनीही वैशाली यांना आवाज देऊन सतर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु कानात ‘हेडफोन’ असल्याने त्याचा उपयोग झाला नाही. लोकलजवळ आल्यावर दादू यांनी वैशाली यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लोकलची धडक दोघांनाही बसली. रुग्णालयात नेले असता दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (रेल्वे रूळ ओलांडणे हा अपराध आहे, हे माहिती असूनही नागरिकांना त्याची जाणीव का नाही ? याविषयीचे गांभीर्य निर्माण करण्यात प्रशासन अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल ! – संपादक)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी