
सोलापूर येथील गोरक्षक श्री. गोपाल सोमाणी हे गेली २९ वर्षे गोसेवा करत आहेत. ते ‘अहिंसा गोशाळे’च्या माध्यमातून ८०० गायींचा सांभाळ करत असून देशी गायींचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत !

साध्वी ऋतुंबरा यांच्या सभेतून प्रेरणा घेऊन गोसेवेस प्रारंभ !
श्री. सोमाणी यांनी वर्ष १९९६ मध्ये साध्वी ऋतुंबरा यांच्या सभेतून प्रेरणा घेऊन गोसेवेस प्रारंभ केला. ते बजरंग दलाच्या माध्यमातून गोसेवेचे कार्य करत असून त्यांना इंदूरचे श्री. हुकुमचंद सावला, मुंबईचे श्री. लक्ष्मीनारायण चांडक, नागपूरचे श्री. सुनील मानसिंग यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रारंभी त्यांनी १५ वर्षे गायीचे महत्त्व, गोसेवा यांचा अभ्यास केला, विविध ग्रंथांचे वाचन केले आणि वर्ष २०१० पासून प्रत्यक्ष गोरक्षण, गोपालन सेवा चालू केली.
देशी गायींच्या सेंद्रिय खताचा प्रसार, प्रचार !
देशी गायींच्या सेंद्रिय खताचा प्रसार, प्रचार आणि महत्त्व समाजाला सांगण्यास प्रारंभ केला. वैयक्तिक संपर्कातून अनेक जण जोडले गेले सोबतच महिलांचाही सहभाग मिळाला. विविध ठिकाणी बैठका घेऊन प्रबोधन करण्याचे कार्य चालू केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना गोशाळेत नेऊन प्रत्यक्ष गो-सेवा कशी केली जाते, याची प्रात्यक्षिके दाखवण्याचे काम चालू केले. या उपक्रमात ‘राधा-राणी महिला मंडळ’ यांचा सर्वात प्रथम सहभाग मिळाला. महिलांना जोडण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे संपूर्ण कुटुंब जोडण्यास साहाय्य होते, तसेच सुट्टीच्या दिवशी संपूर्ण परिवार गोशाळेत भेट देण्यास प्रारंभ करतात.
वर्ष २००२ पासून ‘अहिंसा गोशाळे’च्या माध्यमातून गायींचा सांभाळ !
वर्ष २००२ मध्ये ‘अहिंसा गोशाळे’ची स्थापना केली आणि या गोशाळेत सध्या ८०० गायी आहेत. या गोशाळेची ४ एकर भूमी असून यात चार्याची सोय केली आहे. गायींना लागणारा हिरवा चारा हा प्रतिदिन विकत आणला जातो. वर्ष २००२ पासून आतापर्यंत १० सहस्र गायींची सेवा केली. यामध्ये १४ कर्मचारी पूर्णवेळ सेवा देतात, २ डॉक्टर आहेत. या गोशाळेमध्ये गायींसाठी ९ शेड असून कर्मचार्यांची रहाण्याची सोय केली आहे. येथील अडीच एकरमध्ये ६०० गायी मुक्त संचार करतात. येथील शेतखत आणि गोमूत्र शेतकर्यांना अल्पदरामध्ये दिले जाते. गोशाळेत ज्या गायींचा मृत्यू होतो त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोशाळेची अर्धा एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे.
गोशाळेच्या माध्यमातून विविध उत्सव !
गोपाष्टमी दिवशी गोपूजन केले जाते. प्रतिदिन सायंकाळी ३ घंटे ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून गायींना नामसंकीर्तन ऐकू जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कृष्णाला जसे ५६ भोग लावले जातात, त्याचप्रकारे इथेही हा उत्सव गायींसाठी साजरा केला जातो. संक्रांतीला जसे महिलांना वाण दिले जाते, तसे ८ वर्षे अविरतपणे गायींसाठी वाण मागण्याची जागृती समाजात करतात. गायींसाठी वाण म्हणून सरकी पेंड मागितली जाते.
विशेष प्रयत्न
१. प्रत्येक वर्षी १०८ नवीन लोकांना गोशाळा दाखवण्यासाठी प्रयत्न असतो.
२. प्रत्येक मासातील एकादशीच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात ज्यांच्या घरी देशी गायी आहेत त्यांना ते स्वतः आणि सहकार्यांसमवेत जाऊन स्वतः चारा देऊन नमस्कार करतात. हे कार्य गेली १० वर्षे चालू आहे.
३. कोरोना काळात ‘सॅनिटायझर’च्या ऐवजी गोमूत्र वापरणे !
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात देशी २ सहस्र गायींपासून बनवलेल्या शेणीद्वारे प्रत्येक घरात २ याप्रमाणे एकाच दिवशी त्या पेटवून श्रीरामरक्षा स्तोत्र पठण करून घेतले. याद्वारे एकाच दिवशी १० सहस्र लोकांनी रामरक्षा पठण केले. याद्वारे वातावरण शुद्ध झाले. ४. २४ घंटे अखंड ‘राम’ नामाचा ऑनलाईद्वारे जोडलेल्या लोकांनी नामजप करणे हा उपक्रम श्रीरामनवमी ते हनुमान जयंती असा राबवण्यात आला. यात ५ माळा नामजप करण्यात येतो. एक माळ गोमातेच्या संवर्धन आणि संरक्षण, एक माळ गोरक्षकांचे आरोग्य, एक माळ सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे रक्षण आणि आरोग्य, एक माळ पोलिसांचे रक्षण आणि आरोग्य यांसाठी, तर एक माळ रामाचा नामजप करणाऱ्या परिवारांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी केला जातो. या नामजपासाठी एक ‘व्हॉट्सअँप ‘चा गट असून त्यात देशातील देहली, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कोलकाता या राज्यांतून, तसेच संयुक्त अरब अमिरातमधील दुबई शहरातून २८९ परिवार जोडले गेले आहेत. आतापर्यंत ६३ लाख ३ सहस्र ३७९ जप पूर्ण झाला आहे. हा उपक्रम सध्या प्रतिदिन चालू असून ९० जण ५ माळा ‘राम’ हा जप करतात.
५. श्री. सोमाणी हे व्यापारी असून त्यांच्या दुकानाच्या व्हिजिटिंग कार्डवर आणि कापडी पिशवीवर ‘देशी गायींची सेवा करा’, असा संदेश दिला आहे.
६. श्री. सोमाणी यांना त्यांच्या कार्यात पुणे येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते.
अन्य कार्य आणि सन्मान !१. श्री. सोमाणी हे ‘दमानी ब्लड बँके’मध्ये ‘रेड क्रॉस’चे सभासद आणि ‘हेडगेवार ब्लड बँके’मध्ये सल्लागार म्हणून आहेत. त्यांचा ‘व्हॉट्सॲपचा एक ग्रुप असून त्याद्वारे विनामूल्य रक्तदाता पुरवण्याची सेवा केली जाते. २. गीता परिवार यांच्यावतीने प.पू. स्वामी गोविंद देव गिरि यांच्या हस्ते ‘प्रेरक कार्य’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे, तसेच ‘लायन्स क्लब’च्या वतीने ‘रियल हिरो’ पुरस्कार देण्यात आला आहे. यांसह विविध संस्थांनी उल्लेखनीय गोसेवा आणि रक्तपुरवठा सेवा करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिले आहेत. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !