|

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार वर्ष २०१४-१५ मध्ये झाला आहे; परंतु विभागीय चौकशीमध्ये जे कुणी दोषी अधिकारी सापडले आहेत, त्या सर्वांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उत्तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेमध्ये दिले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याविषयी भाजपचे सदस्य दादाराव केचे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री लोढा यांनी या प्रकरणाची माहिती देतांना सांगितले की, १०० कोटी रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीचा हा गैरव्यवहार वर्ष २०१४-१५ मध्ये घडला. त्यानंतर गुन्हा नोंद केला. त्यानंतर वर्ष २०१७ मध्ये अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये पुन्हा नवीन समितीची स्थापना केली. वर्ष २०२१ मध्ये त्याचा अहवाल सादर झाला. नोव्हेंबर २०२१ मध्ये हे प्रकरण लोकायुक्ताकडे गेले. त्यांनी सचिवांचे अभिप्राय मागवले. वर्ष २०२३ मध्ये समिती चौकशी अहवाल मुख्य सचिवांनी सादर केला. मार्च २०२३ मध्ये संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. वर्ष २०२४ मध्ये लोकायुक्तांचा आदेश प्राप्त झाला की, उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधिशांकडून या प्रकरणाची चौकशी करावी; परंतु आतापर्यंत तसे कोणतेही न्यायाधीश मिळाले नाहीत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !