कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !

कोल्हापूर, १७ जुलै (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाल्यावर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जाणारे साक्षीदार भास्कर तोडकर हे घटनास्थळी पोचल्याची वेळ पोलीस जबाबात वेगळी सांगतात, तर प्रत्यक्ष न्यायालयात साक्ष दिली, तेव्हा वेगळी सांगतात. घटनेच्या ठिकाणी अग्नीशमनदलाची गाडी ते पाहिल्याचे सांगतात. या ठिकाणाविषयी प्रत्यक्ष जबाब आणि न्यायालयात दिलेला जबाब यांत विसंगती आहे. त्यामुळे तोडकर यांच्या साक्षीत अनेक तफावती असून त्या अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या समोर उघड केल्या. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील एक साक्षीदार भास्कर तोडकर यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली असून बचाव पक्षाच्या वतीने त्यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनीही भास्कर तोडकर यांची उलट तपासणी घेतली. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या वेळी अधिवक्त्या प्रीती पाटीलही उपस्थित होत्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !