तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांची स्पष्टोक्ती

नवी देहली : विदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध सिद्धता दुर्बल होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला दाखवून दिले आहे की, आपल्यासाठी स्वदेशी ‘सी-यूएएस्’ (काऊंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) म्हणजेच ड्रोनविरोधी प्रणाली असणे का महत्त्वाचे आहे.
आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करावी लागेल, अशी माहिती तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस् – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी येथे दिली. ‘कालच्या (जुन्या) शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जनरल चौहान यांनी म्हटले की,
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानने नि:शस्त्र ड्रोनचा वापर केला. बहुतेक ड्रोन पाडण्यात आले. त्यांपैकी कोणतेही ड्रोन सैनिकी किंवा नागरी पायाभूत सुविधा यांना हानी पोचवू शकले नाहीत. मला वाटते की, ड्रोन हे उत्क्रांतीवादी आहेत आणि युद्धात त्यांचा वापर अतिशय क्रांतीकारी ठरला आहे. भारतीय सैन्याने क्रांतीकारी पद्धतीने ड्रोनचा वापर केला. आपण लढलेल्या अनेक युद्धांमध्ये तुम्ही हे पाहिले असेल.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण