|

बेंगळुरू – कर्नाटकातील हासनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या ४० दिवसांत येथे हृदयविकाराच्या झटक्यामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी ६ जण १९ ते २५ या वयोगटातील होते, तर ८ जण २५ ते ४५ या वयोगटांतील होते. बंगळुरूमधील जयदेव रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
१. डॉक्टरांनी सांगितले की, हसन आणि जवळच्या जिल्ह्यांमधून सहस्रो लोक खबरदारीची उपाययोजना म्हणून हृदयाशी संबंधित तपासणीसाठी प्रतिदिन मैसुरूमधील जयदेव रुग्णालयात पोहोचत आहेत.
२. जयदेव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.एस्. सदानंद म्हणाले, ‘‘माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर लोक घाबरून रुग्णालयात धावत आहेत. रुग्णालयात एकदा चाचणी करून समस्या सुटणार नाहीत. लोकांनी जवळच्या कोणत्याही रुग्णालयात जाऊन त्यांच्या हृदयाची तपासणी करून घ्यावी. केवळ हृदय तपासणी करून भविष्यातील समस्या टाळता येणार नाहीत. जीवनशैलीत पालट करणे, तसेच चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे.

३. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतिवर्षी अनुमाने ६ कोटी लोकांचा मृत्यू होतो. यांपैकी अनुमाने ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात. हा आजार जगात सर्वाधिक मृत्यूंचे कारण आहे. प्रतिवर्षी अनुमाने १ कोटी ७५ लाख लोक कोणत्या ना कोणत्या हृदयरोगामुळे त्यांचे प्राण गमावत आहेत.
४. पूर्वी हृदयरोगाचे बहुतेक रुग्ण ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. आता नवीन समस्या अशी आहे की, गेल्या काही वर्षांत ३० वर्षांपेक्षा अल्प वयाचे लोकही त्याचे बळी ठरत आहेत. कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा ! – जिल्हाधिकारी मनुज जिंदल