
पुणे – महानगरपालिका प्रतिदिन पवना धरणातून ५५० दशलक्ष, एम्.आय.डी.सी.कडून ३० दशलक्ष, आंद्रा पाणी योजनेतून १०० दशलक्ष, असे एकूण ६८० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण प्रक्रिया करून शहराला पुरवते. एकूण १ सहस्र दशलक्ष लिटर पाणी शहरवासियांकडून वापरले जाते आणि त्यातून अंदाजे तितकेच सांडपाणी निर्माण होते. या तयार झालेल्या एकूण सांडपाण्यापैकी महानगरपालिकेच्या ४२३ मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रात केवळ ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उरलेले ६०० दशलक्ष लिटर पाणी महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करताच थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे शहरातील मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत.
नदीपात्रात जलपर्णी वाढण्याचे हे एक कारण आहे. प्रदूषणामुळे नदीपात्रात प्रचंड दुर्गंधी येते, डासांचा प्रादुर्भाव होतो, काही ठिकाणी पाण्यावर पांढरा फेस तयार होतो. नदीपात्रातील मासे मृत होत आहेत. यावर शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी ४३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे १२ मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !