एकदा मी प.पू. डॉक्टरांना म्हटले, ‘‘तुमच्या मूळ स्वरूपाला (तुमच्या दैवी अवताराला) आम्ही ओळखू शकत नाही. आमच्यासाठी ते कठीणच आहे.’’ त्यावर प.पू. डॉक्टर स्मितहास्य करत गोड हसले. मला वाटायचे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतार आहेत.

मला त्यांच्या मूळ स्वरूपाला जाणता यायला हवे.’ परात्पर गुरु पांडे महाराज आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्यासारख्या उच्च प्रतीच्या संतांनी खर्या अर्थाने प.पू. डॉक्टरांच्या मूळ दैवी स्वरूपाला ओळखले होते. परात्पर गुरु पांडे महाराज हे ज्ञानमार्गी होते. परात्पर गुरु पांडे महाराज आणि प.पू. डॉक्टर यांचे दूरध्वनीवर संभाषण होत असे. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांची महानता अधोरेखित केलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निद्रावस्था आणि क्षीरसागरात पहुडलेला शेषशायी श्रीविष्णु !
परात्पर गुरु पांडे महाराज वयाच्या ९० व्या वर्षीही पहाटेपासून रात्रीपर्यंत पुष्कळ उत्साही असत. एकदा प.पू. डॉक्टर परात्पर गुरु पांडे महाराज यांना म्हणाले, ‘‘महाराज, तुम्ही या वयातही दिवसभर कार्यरत असूनही किती उत्साही असता ! मी मात्र थकवा असल्याने झोपलेला असतो.’’

यावर परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘भगवंताने निद्रा घेणे आवश्यक आहे. शेषशायी विष्णुसुद्धा क्षीरसागरात पहुडलेला असतो. भगवंताच्या निद्रावस्थेतील ऊर्जेच्या बळावर हे जगत कार्यरत असते. भगवंत सदैव जागृतावस्थेत राहिला, तर त्याचे चैतन्य आणि ऊर्जा या जगताला सहन होणार नाही, पेलवणार नाही.’’ या उदाहरणाद्वारे ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांचे किती सुंदर वर्णन केले आहे !’, हे लक्षात आले.
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् वेदपुरुष आहेत’, असे सांगणे !परात्पर गुरु पांडे महाराज यांना गीता आणि वेद यांमधील अनेक श्लोक मुखोद्गत होते. आध्यात्मिक विषयांवर संवाद साधतांना परात्पर गुरु पांडे महाराज गीतेतील अध्याय प.पू. डॉक्टरांना म्हणून दाखवत. त्या वेळी प.पू. डॉक्टर परात्पर गुरु पांडे महाराज यांना म्हणाले, ‘‘महाराज, तुम्ही गीता आणि वेद यांचा किती अभ्यास केला आहे ! तुम्हाला किती येते ! मी तर कधीच असा अभ्यास केला नाही आणि मला यांतील काहीच येत नाही.’’ त्यावर परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘तुम्हाला वेदांच्या अभ्यासाची आवश्यकता नाही. तुम्ही साक्षात् वेदपुरुष आहात. तुम्ही जे बोलाल, त्याचे वेद सिद्ध होतात !’’ – श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२५) |
२. द्वापरयुगात श्रीकृष्णाने गीता सांगितली असणे आणि कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून गीता आचरणात कशी आणायची ?’, याविषयी सांगितले असणे
परात्पर गुरु डॉक्टरांचे माहात्म्य सांगतांना परात्पर गुरु पांडे महाराज म्हणायचे, ‘‘द्वापरयुगात भगवंताने जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार घेतला, त्या वेळी त्याने सर्व मानवजातीला गीता सांगितली. आता कलियुगात भगवंताने प.पू. डॉक्टरांच्या रूपात अवतार धारण केला आहे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून गीता आचरणात कशी आणायची ?’, हे या अवतारात प.पू. डॉक्टरांनी आपल्याला सांगितले आहे. मनुष्याने ‘अपेक्षा करू नये’, हे गीतेत सांगितले आहे; मात्र आपल्यात ‘अपेक्षा करणे’, हा अहंचा पैलू असेल, तर ‘त्याचे निर्मूलन कसे करायचे ?’, हे प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे.’ यावरून प.पू. डॉक्टरांची महानता लक्षात येते.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२५)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !