
‘मी सांगतो ते तुम्हाला ५० वर्षांनी पटेल. माझी ५० वर्षे थांबण्याची तयारी आहे.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर
पुण्यातील एका सभेमध्ये सावरकर म्हणाले होते. ‘मी जर राष्ट्रपती झालो, तर २ कोटी खडे सैन्य उभारीन आणि रशियन पंतप्रधान ख्रुश्चेव्ह यांनी ‘युनो’मधील (संयुक्त राष्ट्रांतील) सभेत जोडा काढून दाखवला, तशी मी त्याला माझी चप्पल काढून दाखवीन. राष्ट्र केवळ सैन्यबळावरच उभे रहाते.’
भारताचे संरक्षणमंत्री आदरणीय राजनाथ सिंह यांनी चीनमधील क्विंगदाओ येथे आयोजित केलेल्या ‘शांघाय सहकार्य परिषदेत’ पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला; कारण त्या निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख होता; पण पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाचा उल्लेख टाळण्यात आला होता; म्हणून या गोष्टीचा पूर्वीप्रमाणे केवळ निषेध न करता स्वाक्षरी न करण्याची कृती करून दाखवली.
आपल्या संरक्षणमंत्र्यांची ही कृती केंद्र सरकारच्या सध्याच्या सैन्य सिद्धतेमुळे झाली आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन !
– श्री. विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा पुणे. (२७.६.२०२५)
अतिक्रमण, राजकीय संरक्षण आणि प्रशासनाचे अपयश !
देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय !
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्राच्या इतिहासात एक वेगळे आणि दखलपात्र म्हणून चिरकाल स्मरणात राहील !