
पुणे, ५ जुलै – सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाचे तत्कालीन (पुणे विद्यापीठ) माजी प्रभाग कुलगुरु आणि सावरकरवादी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर (वय ८९ वर्षे) यांचे ५ जुलै या दिवशी पुणे येथे निधन झाले. ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव संगमनेर असून त्यांचे शिक्षण तेथील पेटीट हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथील एच्.पी.टी. महाविद्यालयात झाले. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर त्यांनी पीएच्.डी. मिळवली.
वर्ष १९५८ ला पुण्यातील सराफ विद्यालयात (आता भारत हायस्कूल) नंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ येते अध्यापन केले. पुणे विद्यापिठात ते प्रभाग कुलगुरु झाल्यावरही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापिठात ते अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकवत. सावरकरांच्या विचार प्रसारासाठी त्यांनी अमेरिका, मॉरिशस येथे व्याख्याने दिली आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !