
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ घंटे करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३ जुलै या दिवशी विधानसभेत केली.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, सद्य:स्थितीत सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन अनुमतीने होते; पण दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक वाढते. ही परिस्थिती पालटण्यासाठी महाखनिज पोर्टलवरून २४ घंटे ईटीपी सिद्ध करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून प्रत्येक वाळूघाटाचे जिओ-फेन्सिंग केले जाणार आहे. घाट आणि मार्गांवर सीसीटीव्ही बसवले जातील, तसेच वाळू वाहतूक करणार्या वाहनांना जी.पी.एस्. डिव्हाइस अनिवार्य करण्यात येणार आहे. नवीन वाळू धोरणावर सभागृहात चर्चा व्हावी अशी सदस्यांची मागणी मान्य करत आपण या धोरणावर कोणत्याही वेळी चर्चा करण्यास सिद्ध आहोत. जनतेकडून आलेल्या १ सहस्र २०० हून अधिक सूचना विचारात घेऊन अंतिम धोरण निश्चित करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !