शिमला – अतीवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये १५० घरे कोसळली, तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशने ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता गमावली आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
१. मंडी जिल्ह्यातील थुनाग सर्वाधिक प्रभावित आहे. येथील रस्ते बंद आहेत. वीज आणि पाणी यांचा पुरवठा देखील थांबला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाने हानी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
२. पीडितांसाठी साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. हवाईदलाकडून अन्नाची पाकिटे पुरवण्यात येत आहेत.
३. पुरात १६४ गुरेही ठार झाली आहेत. एकूण ४०२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
४. शिमलामध्येही भूस्खलन झाले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !