पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’चीही पुरवली होती गोपनीय माहिती !

नवी देहली – येथील भारतीय नौदलाच्या मुख्यालयात लिपिक (क्लार्क) म्हणून कार्यरत असणार्या विशाल यादव या कर्मचार्याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. विशाल यादव भारताच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ला (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेला) पुरवत होता. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही त्याने गोपनीय माहिती पाकला पुरवली. अनेक महिने त्याच्यावर पाळत ठेऊन राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने त्याला अटक केली. तो हरियाणातील रहिवासी आहे. यादव हा आय.एस्.आय.साठी काम करणार्या प्रिया शर्मा नावाच्या महिलेच्या सामाजिक माध्यमाद्वारे संपर्कात होता.
विशाल यादव याने नौदल मोहिमांविषयीची गोपनीय माहिती आणि अन्य संरक्षण संस्था यांविषयीची माहिती प्रिया शर्मा हिला माहिती पुरवली. या बदल्यात तिने विशाल यादव याला पैसे पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. तो या महिलेल्या अनेक वर्षांपासून संपर्कात होता. त्याने या काळात अनेक माहिती तिला पुरवली. त्याने किती गोपनीय माहिती दिली ? या हेरगिरीच्या जाळ्यामध्ये आणखी किती जण आहेत ?, ते शोधून काढण्यासाठी विशाल यादव याची कसून चौकशी काली जात आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी देणेच योग्य शिक्षा ठरेल ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !