|

मुंबई, २५ जून (वार्ता.) – देशात राबवण्यात येणार्या योजनांमधील पैशांचा अपव्यय टाळून जनतेचा पैसा योग्य प्रकारे व्यय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी देशभरातून महाराष्ट्रात केंद्रीय परिषदेसाठी आलेले ६०० हून अधिक विशेष मान्यवर मुंबईमध्ये ४ दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले. त्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेवर कोट्यवधी रुपयांचा व्यय करण्यात आला; मात्र ज्यासाठी हे सर्व मान्यवर आले होते, त्या परिषदेचे काम २ दिवसांत केवळ साडेचार घंटे झाले. त्यातही बहुतांश वेळ हा उद्घाटन सत्र आणि त्यामधील भाषणांमध्ये गेला. देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या महत्त्वाच्या विषयासाठी देशभरातून आलेल्या या मान्यवरांनी २ दिवसांतील एक पूर्ण दिवसही परिषदेसाठी दिला नाही. परिषदेपेक्षा मुंबईतील महत्त्वाची स्थळे पहाण्यातच या मंडळींचा अधिक वेळ गेला. त्यामुळे ‘जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठीच्या या परिषदेसाठीच कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला का ?’ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील अंदाज समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, यासाठी २३ आणि २४ जून या दिवशी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये या केंद्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती, केंद्रीय अंदाज समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. लोकसभेसह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील अंदाज समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी या परिषदेसाठी महाराष्ट्रात आले होते. प्रत्येक राज्यातील अंदाज समितीचे अध्यक्ष आणि त्यांसमवेत ४ आमदार, तर काही खासदारही उपस्थित होते. अशा ३०० हून अधिक लोकप्रतिनिधींची व्यवस्था ‘ताज’ हॉटेलमध्ये, तर त्यांच्यासमवेत आलेल्या ३०० हून अधिक अधिकार्यांची व्यवस्था ‘ट्रायडंट’ या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
अंदाज समितीच्या सदस्यांच्या व्यवस्थेवरच कोट्यवधी रुपये खर्च !या परिषदेमध्ये भाषण करतांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘देशाच्या प्रत्येक पैशाचा उपयोग जनतेच्या कल्यासाठीसाठी करण्यासाठी अंदाज समिती काम करील’, असे वक्तव्य केले होते. या अंदाज समितीच्या सदस्यांची व्यवस्था करण्यावरच कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे; मात्र त्या तुलनेत काम मात्र अल्प झाले आहे ! |
अधिक वेळ कामकाज करता आले असते ! – जितेंद्र भोळे, सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ
या परिषदेसाठीचे कामकाज आम्ही लोकसभेकडे पाठवलेले होते. त्यामध्ये कामकाजासाठी अधिक वेळ देण्यातही आला आहे; मात्र आयत्या वेळी कामकाजामध्ये पालट करण्यात आला. यापूर्वी अशा परिषदा ३-४ दिवस व्हायच्या. यामध्ये शेवटचा दिवस प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी असायचा. या वेळी कामकाजासाठी अधिक वेळ देता आला असता, अशी प्रतिक्रिया विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाराष्ट्राच्या पैशाच्या अपव्यय रोखण्यासाठी काम करणारी मंडळीच पैशाचा अपव्यय करत असतील, तर हे काम कसे करणार ? |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !