केवळ उदारमतवादी (लिबरल) लोकांना हा पुरस्कार दिला जात असल्याचा आरोप
वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचे श्रेय देत नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली. याविषयी बरीच चर्चा झाल्यानंतर आता स्वतः ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘खरे तर रंवाडा-काँगो, यांच्यातील संघर्ष थांबवल्यासाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. यासह सर्बिया-कोसोवो यांच्यातील संघर्ष थांबवण्यात माझी महत्त्वाची भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष तर मोठा होता. तोही मी रोखला. त्यामुळे मला ४-५ वेळा नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. तथापि मला कधीही हा पुरस्कार मिळणार नाही; कारण ते (नोबेल पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करणारे) केवळ उदारमतवादी (लिबरल) लोकांना पुरस्कार देतात.’’
😤 Trump fumes: “I’ll never get the Nobel Prize!”
Claims it’s reserved only for liberals. 🏛️
From an Indian lens, both the flip-flopping Donald Trump and many controversial Nobel winners have lost all credibility! 🦎🏆#NobelPrize #GlobalPolitics#AsimMunir pic.twitter.com/BesyS5WfJR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2025
संपादकीय भूमिकाभारतियांच्या दृष्टीने क्षणाक्षणाला सरड्याप्रमाणे रंग पालटणारे ट्रम्प आणि अनेक वादग्रस्त व्यक्तींना दिले जाणारे नोबेल पुरस्कार, या दोघांचीही विश्वासार्हता शून्य आहे ! |

Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया