
१. लोकल रेल्वेगाड्यांमधून पडून ८ प्रवाशांचा मृत्यू
‘मुंबईतील चाकरमानी प्रतिदिन लोकल गाड्यांनी प्रवास करत असतात. त्यांना पालघर, बोरीवलीपासून चर्चगेटपर्यंत आणि कसारा-कर्जतपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत अडीच-तीन घंट्यांचा प्रवास सकाळ-संध्याकाळ करावा लागतो. गाडीत जेवढी आसन व्यवस्था असते, त्याहून दुप्पट लोक उभ्याने प्रवास करत असतात. अनेक जण पाठीवर बॅग घेऊन दारात उभे राहून प्रवास करतात. त्यांच्यातील काही जणांसाठी ९ जून हा दिवस दुर्दैवी ठरला. ९ जून या दिवशी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ २ लोकल वळणावरून जात असतांना प्रवाशांच्या बॅग परस्परांशी घासल्या गेल्या. त्यामुळे धक्का लागून १३ प्रवासी रुळावर पडले आणि त्यातील ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना सरकार आणि रेल्वे यांनी आर्थिक साहाय्य घोषित केले.

२. मुंबईला पायाभूत सुविधांची आवश्यकता !
एकट्या मुंबई महानगरातून ‘जी.एस्.टी.’ (वस्तू व सेवा कर) आणि अन्य कर यांच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा महसूल केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांना मिळतो. त्यामुळे मुंबईला ‘भारताची आर्थिक राजधानी’ असे संबोधले जाते. प्रत्येक वर्षी केंद्राचा किंवा रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो, त्यात मुंबईला आवश्यक असणार्या पैशाहून न्यून पैसा दिला जातो. जेव्हा असे अपघात होतात, तेव्हा राजकारणी त्यांच्या सोयीनुसार सरकारवर टीका करतात. चौकशी समित्या नेमणे आणि पीडितांना आर्थिक साहाय्य घोषित करणे, याच्या पुढे काही होत नाही. मुळात मुंबईसाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते.
३. मुंबईच्या लोकसंख्या वाढीवर लगाम हवा !
गेली ५० वर्षे मुंबईमध्ये परप्रांतीय, तसेच बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी यांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. ते मिळेल तेथे वस्त्या करून रहात आहेत. त्यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या सरकारने कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर या घुसखोरांच्या पाठीशी लगेच न्याययंत्रणा धावतांना दिसून येते. ९ जून या दिवशी झालेली दुर्दैवी घटना काही दिवस चर्चिली जाते. त्यानंतर दुसरी मोठी दुर्घटना घडते. त्यानंतर सर्व विसरून प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१७.६.२०२५)
एअर इंडियाच्या विमानाचा हृदय हेलावून टाकणारा अपघात !

‘५.६.२०२५ या दिवशी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ‘आय.पी.एल्.’ क्रिकेटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने जिंकल्याने सत्कार समारंभ चालू असतांना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ क्रिकेटप्रेमींचा मृत्यू झाला. त्यानंतर १२.६.२०२५ या दिवशी गुजरातच्या कर्णावतीहून लंडनला चाललेले विमान आकाशात झेपावतांना क्षणार्धात खाली कोसळले. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यासमवेतच ज्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले, तेथील २४ डॉक्टरांचाही या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. अशा स्वरुपाच्या अपघाताला नैसर्गिक गोष्टी, तांत्रिक बिघाड किंवा आतंकवादी षड्यंत्र कारणीभूत आहे का ?, या दृष्टीकोनातूनही विचार करावा लागतो. त्यामुळे यासाठी जी चौकशी समिती नेमली आहे, तिच्या निष्कर्षाची संपूर्ण देश प्रतीक्षा करत आहे. बोईंग कंपनीची ‘ड्रीम लाईनर’ ही विमाने चांगल्या दर्जाची होती का ? जर ती चांगल्या दर्जाची होती, तर मग काही वर्षे अमेरिका आणि युरोपीय संघ यांनी त्यांच्या देशात या विमानावर बंदी का घातली होती ?, हाही प्रश्न येथे उपस्थित होतो. या विमानात काही तांत्रिक दोष होता का ?, या विमानात इंधन भरतांना ज्या संस्था काम करतात, त्यांच्या प्रामाणिकपणावर काही शंका आहेत का ?, त्यांनी भरलेले इंधन शुद्ध होते का ? कि त्यात भेसळ होती, ज्यामुळे अपघात झाला ?, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताला कुणीही कारणीभूत असले, तरी अनेक जीव कायमस्वरूपी त्यांच्या कुटुंबियांना सोडून गेले, हे खरे आहे. नेहमीप्रमाणे या अपघातानंतर ‘एअर इंडिया’च्या टाटा आस्थापनाने पीडितांच्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा केली. प्रत्येक जीव मोलाचा आहे. त्यामुळे सध्या प्रवास करतांना अपघाताचे प्रमाण का वाढले ?, याकडेही नागरिकांनी धार्मिक दृष्टीकोन ठेवून पहाण्याची वेळी आली आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१५.६.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?