उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. स्नेहल बंटीकुमार चव्हाण ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१९ मध्ये कु. स्नेहल बंटीकुमार चव्हाण उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.६.२०२५)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘कु. स्नेहल अभ्यासात हुशार आहे.
२. ती आईला घरकामात साहाय्य करते.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अ. ती प्रतिदिन ४५ मिनिटे नामजप करते. ती शाळेला सुटी असतांना १ ते १.३० घंटा नामजप करते. ‘तिचा नामजप भावपूर्ण होतो’, असे मला जाणवते.
आ. ती व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देते. ती आढाव्यात स्वतःच्या मनाची स्थिती प्रांजळपणे सांगते
इ. ती साप्ताहिक युवा सत्संगाला नियमित उपस्थित असते.
४. ती आम्हा कुटुंबियांना नामजप करण्याची आठवण करून देते.
५. सेवाभाव
ती सेवा करण्यासाठी नेहमी सिद्ध असते. गेल्या वर्षी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस सेवेनिमित्त गेलो होतो, तेव्हा तेथे तिला मिळालेली सेवा ती विचारून करत असे.
६. चुकांविषयी संवेदनशील
ती स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांचे निरीक्षण करते अन् इतरांना चुका प्रेमाने सांगते.
७. संतांप्रती भाव
पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७५ वर्षे) आमच्या घरी आल्यावर स्नेहल आवर्जून त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करते.
बालसाधकांची सत्संग ऐकण्याची तळमळ

‘मी सत्संग घेण्यासाठी कारंजा येथे जातो. तेव्हा कु. स्नेहल, तिची बहीण आणि कु. सोहम् त्यांच्या आई-वडिलांच्या समवेत येतात. कु. स्नेहल, तिची बहीण आणि कु. सोहम् शांतपणे सत्संग ऐकतात अन् आढावाही देतात. त्यांची सत्संगाला येण्याची नियमितता वाखाणण्याजोगी आहे.’
– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे), (६.६.२०२५)
८. जाणवलेले पालट
‘आम्ही रामनाथी आश्रमातून घरी आल्यानंतर तिच्यात अधिक प्रमाणात पालट झाले आहेत’, असे मला जाणवते. आताही ती रामनाथी आश्रमात सेवेला जाण्यासाठी तत्पर आहे.
अ. तिच्यामधील ‘इतरांना साहाय्य करणे आणि समजंसपणा’ या गुणांमध्ये वाढ झाली आहे.
आ. तिची अंतर्मुखता वाढली आहे. ती प्रत्येक प्रसंगात शांत आणि स्थिर असते.
इ. पूर्वी ती चुका लिहित नव्हती. आता ती तिच्याकडून झालेल्या चुका लिहिते. ती स्वयंसूचना सत्रेही करते.
९. स्वभावदोष : आळशीपणा, चालढकलपणा आणि अव्यवस्थिपणा’
– श्री. बंटीकुमार चव्हाण (कु. स्नेहलचे वडील), कारंजा, वाशिम. (२७.५.२०२५)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
‘सेवा’ हा ध्यास असलेले आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे नाशिक येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७९ वर्षे) !
सनातनच्या साधक विद्यार्थ्यांचे परीक्षेतील सुयश !
स्वावलंबी, मुलांना पूर्णवेळ साधना करायला पाठिंबा देणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेल्या पुणे येथील श्रीमती हिरा चंद्रकांत अहिरे (वय ७३ वर्षे) !