बालभारतीने हिंदी विषयाची पाठ्यपुस्तकांची छपाई केल्याचे वृत्त चुकीचे

पुणे – ‘बालभारती’ने इयत्ता पहिलीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमांतील विद्यार्थिसाठी सक्तीच्या हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकांची छपाई केल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त चुकीचे आहे. याविषयी शासन आदेशांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ नुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची कार्यवाही करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या १५ एप्रिल २०२५ या दिवशीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या सर्व विद्यार्थिनीना हिंदी विषय अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते.
या निर्णयाच्या विरोधात विविध राजकीय संघटना आणि अन्य घटक यांनी केलेल्या विरोधानंतर शासन निर्णयामधील हिंदी सक्तीविषयी तिसर्या भाषेसंबंधी स्थगिती घोषित करण्यात आली होती; परंतु तिसर्या भाषेला स्थगिती देण्याच्या घोषणेचा शासन निर्णय अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे हिंदीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई ‘बालभारती’ने केल्याची चर्चा शिक्षणक्षेत्रात चालू होती. या पार्श्वभूमीवर ‘बालभारती’चे संचालक पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप