शिवसेना महानगरप्रमुखांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
नाशिक – शहरात वर्ष २०२७ मध्ये होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, महापालिकेने कुंभमेळ्याच्या सिद्धतेसाठी पूल बांधणीच्या ६ मोठ्या प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांचे एकत्रित अंदाजित मूल्य ११८ कोटी रुपये आहे. महापालिकेने वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामांसाठी काही आर्थिक प्रावधान केले असले, तरी या प्रकल्पांचा एकूण आवाका पहाता महापालिकेच्या सध्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा तो पुष्कळ मोठा आहे.
कुंभमेळा प्रकल्पाला अद्याप शासनाची औपचारिक मान्यता मिळालेली नाही. यामुळे निधीच्या उपलब्धतेविषयी अनिश्चितता निर्माण होते आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी शासनाने महापालिकेला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक