
चित्र सौजन्य : Nedrick News Punjab
होशियारपूर (पंजाब) : येथील नूरपूर जट्टान गावात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा दावा ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने केला आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्याची ही ८ दिवसांत दुसरी घटना आहे. यापूर्वी फगवाडाच्या फिल्लौर भागातही पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. पन्नू याने या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. पुतळ्याजवळ खलिस्तानचा झेंडाही ठेवण्यात आला होता आणि ‘शीख हिंदू नाहीत’ आणि ‘ट्रम्प झिंदाबाद’ यांसारख्या प्रक्षोभक घोषणाही देण्यात आल्या होत्या.
पन्नूने या घटनेवर म्हटले आहे की,
आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या अंतर्गत जनरल जामवाल यांच्या नेतृत्वाखाली जून ते सप्टेंबर १९८४ या काळात ‘ऑपरेशन वुड्रोज’ राबवण्यात आले. या अंतर्गत ९० दिवसांत १५ सहस्रांहून अधिक शिखांना उचलून खटल्याविना मारण्यात आले, असा आरोप केला आहे.
संपादकीय भूमिकागुरपतवंत सिंह पन्नू अमेरिका आणि कॅनडा देशांत राहून भारतात अशा प्रकारच्या कारवाया घडवून आणतो, तरीसुद्धा हे दोन्ही देश त्याला पकडून भारताच्या हातात देत नाहीत, हे लक्षात घ्या ! अमेरिका भारताचा मित्र नाही, तर विश्वासघातकी आणि धूर्त देश आहे, हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे ! |
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !