आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य आरोग्याधिकारी डॉ. कुट्टीकर यांना निलंबित करण्याचा आदेश दिल्याचे प्रकरण
पणजी, ८ जून (वार्ता.) – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉच्या) रुग्णालयाला ७ जून या दिवशी आकस्मिक भेट दिल्यानंतर एका तक्रारीची गंभीर नोंद घेऊन त्वरित संबंधित मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना खडसावून त्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला होता. या वेळी त्यांनी ज्या प्रकारे डॉ. कुट्टीकर यांना वागणूक दिली आणि जी भाषा वापरली त्यावर समाजातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. ‘अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महासंघ’ आणि इतर वैद्यकीय संघटना यांच्यासह विविध वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा करून ‘मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करणार नाही’, असे आश्वासन दिले आहे.

I have reviewed the issue at Goa Medical College and held discussions with the Health Minister. I want to assure the people of Goa that Dr. Rudresh Kuttikar will not be suspended.
The State Government and our dedicated medical team remain fully committed to ensuring the highest…
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) June 8, 2025
डॉ. सावंत म्हणाले,
‘‘लोकांना अमूल्य अशी आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी दिवसरात्र जे कष्ट घेत आहेत, त्याचा मी आदर करतो.’’
माझा सूर चुकला; पण मी क्षमा मागणार नाही ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

पणजी – मुख्य आरोग्य अधिकार्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करणे, तसेच त्यांना सर्वांसमक्ष कठोर शब्दात फटकारणे याविषयी राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे प्रसारमाध्यमांत त्यांची बाजू मांडतांना म्हणाले, ‘‘आपत्कालीन विभागामध्ये गर्दी नसल्याने डॉक्टरांनी रुग्णांना सहानभूती आणि सेवाभाव दाखवणे अपेक्षित होते; मात्र निष्काळजीपणा दाखवण्यात आला. त्यामुळेच आरोग्यमंत्री या नात्याने मी यामध्ये हस्तक्षेप केला.
During the broadcast with Prudent Media last night, I openly extended my heartfelt apology to Dr. Rudresh Kuttikar for the harsh words spoken by me during my visit to GMC. In the heat of the moment, my emotions overtook my expression, and I deeply regret the manner in which I…
— Vishwajit Rane (@visrane) June 9, 2025
माझ्या बोलण्याचा सूर अधिक संयमी असायला हवा होता, हे मला मान्य आहे. माझ्या संवादशैलीचे दायित्व मी स्वीकारतो; मात्र संबंधित डॉक्टरने आरोग्यसेवा नाकारल्याने मी क्षमा मागणार नाही.’’

सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !