Karnataka Muslim Attack On Hindu : खानावळीत जेवल्यानंतर पैसे न देता ३ मुसलमानांकडून हिंदुमालकावर प्राणघातक आक्रमण

सवणूर (कर्नाटक) येथील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

सवणूर (कर्नाटक) – शहरातील संगमेश्वर खानावळीत ३ मुसलमान युवक जेवल्यानंतर पैसे न देता निघून जात असतांना खानावळीचे मालक मृत्युंजय कनवळ्ळीमठ यांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. त्या वेळी या मुसलमानांनी मृत्युंजय यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. त्या वेळी मृत्युंजय यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या  आई, पत्नी आणि मुले यांच्यावरही मुसलमानांनी आक्रमण केले अन् पलायन केले. यासंदर्भात सवणूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी मृत्युंजय यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा न नोंदवल्यास आंदोलन करणार ! – प्रमोद मुतालिक

श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक

पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मुतालिक यांनी सांगितले की, उपाशी असणार्‍यांना अन्न देणार्‍यांवरच आक्रमण करणार्‍या दुष्टांचा उन्मत्तपणा आता थांबवला पाहिजे. अशा गंभीर घटनेत पोलिसांनी गुंडांना अटक करण्यात निष्काळजीपणा दाखवला आहे. जिल्हा प्रशासनाची निष्क्रीयता त्यातून स्पष्ट होते. श्रीराम सेना या प्रकाराचा तीव्र निषेध करते. आक्रमण करणारे अल्लाउद्दीन, आस्पाक आणि फराज या गुंडांवर केवळ साधी तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. असे जर झाले नाही, तर श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्याने मुसलमानांना मोकळीक मिळाल्याने ते हिंदूंच्या विरोधात हवे ते करू शकत आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद आहे !