
नवी देहली : राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकारितेच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे ‘सुदर्शन न्यूज’चे संस्थापक अन् मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांना ‘माय होम इंडिया’ या संस्थेकडून ‘हिंदु केसरी – सेवा, सुरक्षा, समरसता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंदु संस्कृती, राष्ट्रवाद आणि हिंदु समाजजागृती यांसाठी समर्पित निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
१. ‘माय होम इंडिया’ या संस्थेद्वारे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, संस्थेचे संस्थापक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, तसेच ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरेश चव्हाणके यांचे हिंदु समाजाला जागृत, सजग आणि संघटित करण्याचे अतुलनीय कार्य ! – सुनील देवधर, माजी राष्ट्रीय सचिव, भाजप![]() जे कार्य एक संघटित चळवळ वर्षानुवर्षे करूनही साध्य करू शकत नाही, ते सुरेश चव्हाणके हे त्यांच्या एका वृत्तवाहिनीद्वारे करत आहेत. हिंदु समाजाला जागृत, सजग आणि संघटित करण्याचे कार्य ते करत आहेत ! |
२. पुरस्कार प्रदान करतांना ‘माय होम इंडिया’ संस्थेने सांगितले की, गेल्या २ दशकांपासून चव्हाणके हे लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, बांगलादेशी घुसखोरी, मदरशांमधील कट्टरतावाद, तसेच हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील सूत्रांविषयी लोकजागृतीचे कार्य करत आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा ‘हिंदु हितात राष्ट्रहित आणि राष्ट्रहितात हिंदुहित’, हा मूलमंत्र आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीच्या जवळ ‘शिवाजी विश्वविद्यालय’ आणि ‘गुरुकुल’ स्थापन करणार ! – चव्हाणकेपुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. चव्हाणके म्हणाले की, ‘मदरशांमधून औरंगजेब बाहेर पडत आहेत, तर गुरुकुलांमधून छत्रपती शिवाजी महाराज घडले पाहिजेत.
मी ‘माय होम इंडिया’च्या व्यासपिठावरून वचन देतो की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीच्या जवळ ‘शिवाजी विश्वविद्यालय’ आणि ‘गुरुकुल’ स्थापन करणार, जिथे राष्ट्रासाठी समर्पित अन् हिंदु संस्कृतीप्रती जागरूक अशा युवकांना घडवले जाईल.’ |
संपादकीय भूमिकाप्रखर हिंदुत्वनिष्ठ ‘सुदर्शन न्यूज’चे संस्थापक-संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांचे हार्दिक अभिनंदन ! चव्हाणके यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु जनांनी, विशेषतः हिंदुत्वनिष्ठ प्रसारमाध्यमांनी हिंदु राष्ट्र अन् धर्मरक्षणार्थ नि:स्वार्थ रूपाने कार्य करण्याचा निश्चय करणे काळाची आवश्यकता ! |

हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !