Terrorist Lakhvi : पाकमध्ये कारागृहात असतांना आतंकवादी लखवी बाप बनला !

खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या पाकवर अल्जेरिया येथून कठोर टीका

ओवैसी यांचे शिष्टमंडळ

अल्जियर्स (अल्जेरिया) – पाकिस्तानमध्ये झाकीर रहमान लखवी नावाचा एक जिहादी आतंकवादी होता. जगातील कोणताही देश आतंकवादाचा आरोप असलेल्या आतंकवाद्याला अशी अनुमती देणार नाही; पण तो पाकमध्ये कारागृहात असतांना एका मुलाचा बाप बनला. पाकिस्तानला एफ्.ए.टी.एफ्.च्या (फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या – आर्थिक कृती कार्य दलाच्या) करड्या सूचीमध्ये घातल्यानंतर लखवीवरील खटला लगेच पुढे सरकला, अशी कठोर टीका ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) अध्यक्ष असणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे पाकवर केली. ते पाकच्या आतंकवादाची माहिती देण्यासाठी जगभरात गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळात सहभागी झाले आहेत. ओवैसी यांचे शिष्टमंडळ उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया देशात पोचले आहे. ‘आतंकवादाचा मुख्य पुरस्कर्ता असलेल्या पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे जागतिक शांततेच्या हिताचे आहे’, असेही ओवैसी पुढे म्हणाले.