अमेरिकेच्या गोल्डन डोम हवाई संरक्षण प्रणालीवरून उत्तर कोरियाची धमकी !
प्यांगयांग (उत्तर कोरिया) – अमेरिका तिच्या हवाई संरक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ नावाची संरक्षण प्रणाली निर्माण करत आहे. ही प्रणाली क्षेपणास्त्राच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी अवकाशात तैनात केली जाणार आहे. उत्तर कोरियाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका युद्धसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. जर तिने तात्काळ तिची भूमिका पालटली नाही, तर अणूयुद्धाला कुणीही अडवू शकणार नाही.
१. उत्तर कोरियाला वाटते की, ही प्रणाली केवळ अमेरिकेपुरती मर्यादित रहाणार नाही. दक्षिण कोरिया आणि जपान यांसारख्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांमध्येही तिची स्थापना होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही राष्ट्रे उत्तर कोरियाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात.
२. उत्तर कोरियाकडे सध्या सुमारे ५० अणूबाँब आहेत आणि आणखी ९० अण्वस्त्रे सिद्ध होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाने अमेरिकेला दिलेली धमकी गंभीर मानली जात आहे.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman