खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकला सुनावले !

कुवेत सिटी (कुवेत) – पाकिस्तान धर्माचे सूत्र उचलून ‘ते मुसलमान आहेत’, हे बोलू शकत नाही. भारतात मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही भारतीय मुसलमान पाकिस्तानपेक्षा अधिक प्रामाणिक आहोत, अशा शब्दांत ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील आतंकवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईविषयी माहिती देण्यासाठी भारताने काही शिष्टमंडळे विविध देशांत पाठवली आहेत. यांपैकी एक शिष्टमंडळ कुवेतमध्ये गेले आहे. त्यात ओवैसी यांचा समावेश आहे. ते तेथे बोलत असतांना त्यांनी पाकला सुनावले.
मूर्ख विदुषकांना नक्कल करायचीही अक्कल नाही !
पाकिस्तानच्या सैन्यदलप्रमुखांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक छायाचित्र भेट म्हणून दिले. हे छायाचित्र ‘ऑपरेशन सिंदूर’ला पाकच्या सैन्याने दिलेल्या कथित प्रत्युत्तराचे असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात हे छायाचित्र चीनच्या सैन्याच्या सरावाचे होते, हे उघड झाले आहे. त्यावरून ओवैसी यांनी पाकची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, या मूर्ख विदुषकांना (जोकर्सना) भारताचा सामना करायचा आहे. वर्ष २०१९ च्या चिनी सैन्यासमवेतच्या सरावाचे एक छायाचित्र त्यांनी शहबाज शरीफ यांना ‘भारतावरील विजय’ म्हणून भेट केले. पाकिस्तान हेच करतो. नक्कल करण्यासाठी अक्कल पाहिजे. पाकिस्तानला अक्कल नाही.
पाकला एफ्.ए.टी.ए.च्या करड्या सूचीत टाकले पाहिजे !
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, एफ्.ए.टी.ए.च्या (‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’ तथा ‘आर्थिक कृती कार्य दला’च्या) करड्या सूचीचे महत्त्व असे आहे की, जेव्हा तुम्ही पैशांचा व्यवहार करणार, तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष असते. पाकिस्तान भारताविरुद्ध आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतो. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एफ्.ए.टी.ए.मध्ये टाकले पाहिजे; कारण आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून दिले जाणारे २ अब्ज डॉलर्सचे कर्ज पाकिस्तानी सैन्य वापरणार.
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप