भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ष १९४९ पासून वर्ष २०१९ पर्यंत अनेक संघर्ष झाले; परंतु पहलगामच्या बैसरन खोर्यातील आतंकवादी आक्रमणाला भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे. पहलगाममधील आतंकवादी आक्रमण हा आतापर्यंतच्या पाकिस्तानपुरस्कृत आक्रमणांपेक्षा वेगळा होता.

१. पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना भारतासह जगासाठी डोकेदुखी
आतंकवाद्यांनी जाणीवपूर्वक नागरिकांना त्यांचा धर्म विचारून ‘टार्गेटेड किलिंग’ (लक्ष्य करून केलेली हत्या) केले आणि यामध्ये २८ निष्पाप भारतीय पर्यटक मारले गेले. यातून पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना या जागतिक पातळीवर सक्रीय असणार्या आतंकवादी संघटनांशी संलग्न असल्याचे स्पष्ट झाले. धर्म विचारून ‘टार्गेट’ करण्याची ‘मोडस ऑपरेंडी’ (कार्यप्रणाली) इसिस, अल कायदा, हमास यांसारख्या आतंकवादी संघटनांनी यापूर्वीच वापरली होती. मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनीही धर्म, राष्ट्रीयत्व विचारून हत्या केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारत सातत्याने एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो म्हणजे पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना या केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी डोकेदुखी आहेत.

२. पाकिस्तानचा आतंकवाद्यांना आश्रय
ओसामा बिन लादेन हाही पाकिस्तानातच पकडला गेला. आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केलेल्या ज्या हाफिज सईदवर लाखो डॉलर्सचे बक्षीस आहे, त्याचाही मुक्काम पाकमध्येच आहे. डॅनियल पर्ल या पत्रकाराची गळा चिरून हत्या करणार्या अबू जिंदालचा खात्मा आता ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झाला. अमेरिका गेल्या दोन दशकांपासून त्याला पकडू शकलेली नव्हती, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
३. अणूआक्रमणाच्या धमक्यांमधील हवा गेली !
या आक्रमणानंतर सर्वांत मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे पाकिस्तानच्या अणूयुद्धाच्या धमक्यांचा फुगा कायमचा फुटला. साधारणतः वर्ष १९९८ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी बनले. यानंतर भारताने तात्काळ वर्ष १९९९ मध्ये स्वतःचे अणुधोरण घोषित केले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये या धोरणाची घोषणा करतांना ‘भारत कधीही पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही’, हे घोषित केले. ‘भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम हा प्रतिआक्रमणासाठी असेल’, हेही या वेळी घोषित करण्यात आले. भारताने यातून ‘आपण उत्तरदायी देश आहोत’, असे दाखवून दिले.
याउलट पाकिस्तान सातत्याने अण्वस्त्र आक्रमणाच्या धमक्या देत राहिला आणि त्या प्रकारची वक्तव्ये पाकिस्तानच्या शीर्षस्थ नेत्यांकडून करण्यात आली. यामुळे काश्मीर प्रश्नावरून संघर्ष झाला, तर त्याचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते, असा जणू सिद्धांतच बनला. त्यातून जागतिक पटलावर काश्मीर प्रश्न महत्त्वाचा बनला. यामुळे भारतावर गेल्या दोन दशकांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन’विषयी (सामरिक संयमाविषयी) दबाव आला.
४. जलास्त्र अद्यापही कोंडीसाठी सज्ज

भारताने ‘एअर स्ट्राईक’ करण्यापूर्वी ‘सिंधू जल करार’ स्थगित केला. भविष्यात ‘पाकिस्तान सुधारला नाही, तर भारत सिंधू नदीचे पाणी अडवेल किंवा त्या संदर्भातील कोणतीही माहिती प्रसारित करणार नाही किंवा आवश्यकता भासल्यास प्रवाह पालटण्यासही मागे-पुढे पहाणार नाही’, हे पाकला आपण दाखवून दिले. हा निर्णय पुष्कळ मोठे पाऊल ठरला. भारत-पाकिस्तान यांच्यात १० मे या दिवशी झालेल्या युद्धविरामामध्ये कुठेही ‘सिंधू जल करार’ स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याचा उल्लेख नाही, हे विशेष !
झेलम नदीला आलेल्या पुराची माहिती भारताने पाकिस्तानला दिली नाही. परिणामी या पुराचा फटका पाकला बसला. चिनाब नदीवरील प्रकल्पाचे दरवाजे भारताने एकाएकी बंद केले. यामुळे काही काळासाठी चिनाब नदीची पाकमधील पाण्याची पातळी
१७ ते १८ फुटांवरून २-३ फुटांपर्यंत घसरली. याचा आपल्याकडील शेतीवर परिणाम होऊ शकतो, हे पाकला कळून चुकले. येणार्या भविष्यात भारत-पाक संघर्षाचा केंद्रबिंदू काश्मीरसह पाणी हाही असेल, हे यातून समोर आले.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे.
(साभार : दैनिक ‘लोकमत’, १८.५.२०२५)
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !