
मुंबई – राज्यशासनाने ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी जाहीर केलेल्या एकत्रित धोरणानुसार विनाकारण भाडे रहित करणार्या चालकास भाड्याच्या १० टक्के किंवा १०० रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे प्रावधान केले आहे. हा दंड नोंदणी करणार्या ग्राहकाच्या खात्यात जमा होईल. ग्राहकानेही कारण न देता फेरी रहित केल्यास त्याला ५० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. अनेकदा मोबाइल ॲपवरून कॅब नोंदवल्यावर जवळचे भाडे असल्यास किंवा अपेक्षित भाडे नसल्यास कॅबचालक नोंदणी रहित करतात आणि प्रवाशांना नोंदणी रहित करण्यास भाग पाडतात.
महिला प्रवाशांसाठी प्रवासात सर्वोच्च सुरक्षितता राखण्यासाठी सहप्रवासासाठी केवळ महिला चालक किंवा महिला सहप्रवासी निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !