(म्हणे) ‘भारताच्या विनाकारण आणि भ्याड आक्रमणाविरुद्ध पोलादी भिंतीसारखे उभे राहिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली !’ – Pakistan Army Chief

पाक सैन्याचे ‘फिल्ड मार्शल’ झाल्यानंतर असीम मुनीर यांचे विधान

पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांना बढती देऊन ‘फिल्ड मार्शल’ करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या इतिहासात सैन्यदलप्रमुखाला फिल्ड मार्शल बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी अयुब खान फिल्ड मार्शल बनले होते. या पदावरून कोणताही अधिकारी कधी निवृत्त होत नाही. मुनीर यांचा सन्मान करण्यासाठी रावळपिंडी येथील सैन्याच्या मुख्यालयात समारंभ आयोजित करण्यात आला होता. सन्मानानंतर मुनीर म्हणाले की, हा सन्मान संपूर्ण पाकिस्तानी समाजाला आणि पाकिस्तान सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिला यांना, विशेषतः पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विनाकारण, भ्याड आणि बेकायदेशीर आक्रमणाविरुद्ध पोलादी भिंतीसारखे उभे राहिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या आक्रमणात मार खाल्ल्यानंतरही मुनीर यांना बढती देण्यात येते, यावरून तेथील व्यवस्था किती हास्यास्पद आहे, हे स्पष्ट होते. अशा व्यवस्थेकडून भारतावर केल्या जाणार्‍या आरोपांना कुणीही भीक घालणार नाही !